"ॲलन ट्युरिंग" चे मराठीतील पहिले चरित्र!
ॲलन ट्युरिंग – एका अशा विलक्षण गणितज्ञाची ही कहाणी आहे, ज्याने आपल्या बुद्धिमत्तेने जगाचा नकाशा बदलला. दुसऱ्या महायुद्धात शत्रूचे गुप्त संदेश उलगडून त्याने लाखो जीव वाचवले आणि युद्धाला कलाटणी दिली. त्यानेच आधुनिक संगणकाचा पाया रचला आणि 'कृत्रिम बुद्धिमत्ता' या आजच्या परवलीच्या शब्दाची संकल्पना जगासमोर मांडली. पण या महान कार्याची किंमत त्याला चुकवावी लागली. तत्कालीन सामाजिक रूढी आणि कायद्यांच्या कचाट्यात सापडून त्याचे आयुष्य एका दुःखद शोकांतिके त संपले. हे पुस्तक ॲलन ट्युरिंगच्या संघर्षमय जीवनाचा, त्याच्या अतुलनीय योगदानाचा आणि त्याला विलंबाने मिळालेल्या न्यायाचा एक हृदयस्पर्शी प्रवास वाचकांसमोर उलगडते. आजच्या डिजिटल युगाच्या या शिल्पकाराची ही प्रेरणादायी गाथा.